Thu. Aug 22nd, 2019

व्यंकय्या नायडू यांनी घेतली भारताच्या उपराष्ट्रपती पदाची शपथ

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

आज व्यंकय्या नायडूंनी 13 व्या उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात हा सोहळा संपन्न झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

 

राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग आणि केंद्र सरकारमधील मंत्री आणि विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.

 

नायडू यांनी हिंदीमध्ये उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. शपथविधीआधी व्यंकय्या नायडू यांनी राजघाटावर जाउन महात्मा गांधीच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय मार्गावर दीनदयाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार आर्पण केला. त्यानंतर पटेल चौकातील सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन शपथविधीसाठी रवाना झाले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *