Wed. Oct 5th, 2022

भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्यपदक हुकलं

टोकियो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाला पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कामगिरी करण्यात अपयश आले . रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या हाफमध्ये गोलशून्य बरोबरीनंतर दुसऱ्या हाफमध्ये तब्बल पाच गोल झाले. ब्रिटनने १-० ची आघाडी बऱ्याच काळ टीकवली होती. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये सामन्यात चार गोल्स झाले. यापैकी ब्रिटनने एक गोल केला. तर भारताने अवघ्या नऊ मिनिटांमध्ये तीन गोल करत हाफ टाइममध्ये ३-२ ची आघाडी मिळवली. ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टर्समध्ये ३-३ ची बरोबर केल्याने अंतीम १५ मिनिटं महत्वाची ठरली. शेवटच्या १५ मिनिटांनंतर सामन्याचे अंतिम स्कोअरकार्ड ४-३ असं होतं.

या पराभवानंतरही त्यांनी ज्या जिद्दीने आणि मेहनतीने इथरवरचा प्रवास केला. त्यासाठी त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी देखील ओलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघात असणाऱ्या ९ हरियाणाच्या खेळाडूंना प्रत्येकी ५० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

टोकियो ओलिम्पिकच्या मैदानात भारताचा महिला हॉकी संघ डिफेंडिंग चॅम्पियन ब्रिटनसोबत कांस्य पदकासाठी भिडत होता. सामन्याच्या पहिला मिनिटापासूनच दोन्ही संघांनी आक्रमक रुप धारण केलं होतं. पहिला क्वार्टर ब्रिटनने गाजवला. परंतु या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.