वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; दुष्काळाचे संकट दूर करणार

महिन्याभरातच विधानसभा निवडणूक ठेपली असून एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला सुरूवात केली असून वंचित बहुजन आघाडी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी आपण विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच जाहीरनाम्यात राज्यातील शेतकऱ्यांवर ओढावलेले दुष्काळाचे संकट दूर करणार तर सह्याद्रीतील धरणांचे पाणी पूर्वेकडे वळणार हा राज्याच्या विकासाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. विधानसभा निवडणूक 288 जागांवर लढणार असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

काय आहे जाहीरनाम्यात ?

सत्ता आल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुष्काळाचे संकट कायमचे दुर करणार आहे.

सह्याद्रीच्या कुशीत असलेले मुळशीसह अन्य पाच आणि कोयना धरण यांचे पाणी पूर्वेकडे वळवणार आहे.

कोयना धरणाचे 65 टीएमसी आणि लोणावळा परिसरातील सहा धरणाचं मिळून 44 टीएमसी पाणी सध्या वीजनिर्मिती साठी वापरले जाते.

टाटा पॉवर शी चर्चा करत दुष्काळ भागात हे पाणी पुरवणार.

तसेच हे पाणी पश्चिम महाराष्ट्रातील काही दुष्काळी भाग आणि मराठवाड्यात देण्याची शक्यता आहे.

टाटा पॉवरचे पाणी चिपळूण मार्गे समुद्रात सोडले जाते. तसेच वीज निर्मितीसाठी अनेक मार्ग असल्यामुळे पाणी वाया घालवण्याची गरज काय ? याच मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

सत्तेत आल्यावर कोणाला वंचित ठेवणार नसल्याचे जाहीरनाम्यात लिहिले आहे.

प्रकाश आंबेडकरांचा युती आणि आघाडीला टोला –

मुख्यमंत्र्यांनी भीतीपोटी वंचित बहुजन आघाडी विरोधीपक्ष होणार असल्याचे सांगितले. मात्र आम्हीच सत्ताधारी होणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.

काही धर्माच्या नावाने तर काही सेक्युलरच्या नावाने निवडणूक लढत आहे. मात्र आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढत असल्याचे आंबेडकरांनी सांगितले.

कॉंग्रेस आणि भाजपा जात बघून उमेदवारी देतात. मात्र आम्ही सर्व लोकांना उमेदवारी देतो.

स्मारकं हवीच मात्र त्यापूर्वी लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

भाजपाने निवडणुकीला इव्हेंट केला असून निवडणुकीला उत्सव म्हणत आहे.

Exit mobile version