श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड

उल्हासनगर येथे शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर हळूहळू आता ठाणे जिल्ह्यातील आसपासच्या शहरांतील उद्धव् ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे शिवसैनिक आक्रमक होताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे समर्थक असा उघड संघर्ष येथे होताना दिसत आहे.
दरम्यान, गुवाहाटीत पहिल्यांदाच शिंदे गटाची पत्रकार परिषद पार पडली तर दुसरीकडे ठाण्यात शिंदे समर्थकांचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती तर शिंदेंच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केले.
विरोधात असताना असंतोष नव्हता तितका असंतोष सत्तेत असताना पाहायला मिळत आहे, असे वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या शिकवणीमुळे आम्ही शांत असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. तसेच धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत असेही ते म्हणाले. आक्रमक शिवसैनिक कार्यालयावर हल्ले करत आहेत. त्यामुळे खरे शिवसैनिक असाल तर समोर या, असे थेट आवाहनही श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.