Fri. Mar 22nd, 2019

वेश्याव्यवसायापेक्षा डान्सबार चांगला, वर्षा काळेंचा तर्क

17Shares

वेश्याव्यवसायापेक्षा डांस बार केव्हाही चांगला, असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे यांनी. डांस बार हा महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराचं  साधन पुरवतं. मात्र सरकारने लादलेल्या अटी इतक्या जाचक होत्या की त्यांच्यासह डान्स बार चालवणं अशक्य होतं. पण डान्स बार बंद झाल्यामुळे अनेक बारबालांना रोजगारासाठी वेश्याव्यवसायाकडे वळावे लागले. मात्र वेश्याव्यवसायाला संरक्षण नसून हा अत्यंत जोखमीचा व्यवसााय आहे. वेश्याव्यवसायापेक्षा महिलांना डान्स बारमध्ये अधिक सन्मानाने काम करता येईल.” असा दावा वर्षा काळे यांनी केला आहे.

राज्य सरकारने डांस बारसंदर्भात काही अटी लागू केल्या होत्या, त्या अटींचा विरोध करत वर्षा काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुरुवारी सुप्रीम कोर्टाने याचिकेवर दिलेल्या निर्णयामूळे डान्स बार मालकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानंतर राज्यामध्ये पुन्हा डांस बार सुरु होणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *