Fri. Sep 30th, 2022

त्या महिला भीकारी म्हणून ज्वेलर्सच्या दुकानात शिरल्या अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, नायगाव

 

नायगाव पश्चिमेकडील मरियमनगर परिसरात गणेश ज्वेलर्समध्ये चोरीची घटना घडली. भीक मागणाऱ्या भटक्या महिलांनी ज्वेलर्सवर हात साफ केला.

 

सकाळी 11च्या सुमारास  नेहमी प्रमाणे दुकान उघडले. तेव्हा अचानक 6 ते 7 भीक मागणाऱ्या भटक्या महिला दुकानासमोर येवून उभ्या राहिल्या.

 

मात्र, त्या महिलांची नजर मालकाच्या काऊंटरवर असलेल्या बॅगेवर गेली आणि त्या महिलांच्या टोळीने मालक अमितला भूरळ पाडत त्यांना घेराव घातला.

 

यानंतर लहान मुलीच्या सहाय्याने दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील बॅगेसह 6 ते 7 लाखांचे दागिने लंपास केले. या संदर्भात पोलिसांचा तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.