Fri. Jul 30th, 2021

वसई-विरारचे महापौर रुपेश जाधव यांचा राजीनामा!

वसई विरारचे महापौर रुपेश जाधव यांच्या राजाजीनाम्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. रुपेश जाधव यांनी राजीनामा दिला की नाही दिला याबाबत वसईत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. पण आता खुद्द पक्षश्रेष्ठी व बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी यावरचा पडदा हटवत उलट सुलट चर्चेला पूर्णविराम लावला आहे.

महापौर रुपेश जाधव यांनी पक्षाकडे राजीनामा दिल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

गेल्या दोन दिवसापासून महापौर रुपेश जाधव यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला उधाण आले होते.

महापौरांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समाज माध्यमांवर फिरत होतं.

पण त्याला कोणताही दुजोरा नव्हता.

पण आता हितेंद्र ठाकूर यांनीच हे वृत्त खरं असल्याचं सांगितलंय.

रुपेश जाधव यांनी मागच्या महिन्यात झालेल्या महासभेत याबाबत आपल्याला महापौरपदाच्या जबादारीतून मुक्त करण्याची आशा व्यक्त केली होती. त्यामुळे जेव्हा त्यांनी पक्षाला राजीनामा सुपूर्त केला तेव्हा तो पक्षाने मान्य केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *