Tue. Jun 28th, 2022

वसंत मोरेंचा मनसे स्थानिक नेत्यांवर आरोप

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेपूर्वी पक्षातील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. पुण्यातील मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज यांच्या सभेच्या आदल्या दिवशीच मनसेच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील मनसेचे काही नेते वसंत मोरे यांनी बांधलेली टीम संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. शहर कार्यालयात बसणारे नेते फर्स्टेट होऊन काम करत आहेत. मी शहराध्यक्ष असताना कधीही फर्स्टेट झालो नव्हतो. माझ्याविषयी गैरसमज आणि अफवा पसरवणारे हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत, असा सवाल वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.