Thu. Jul 9th, 2020

गाव जागवत आली. वासुदेवाची स्वारी!

वासुदेव ही पारंपरिक कला आहे. खेडोपाडी पहाटेच्या सुमारास आपल्या अभंगवाणीमधून सर्वाना देवांची आठवण करणारा देवदूत म्हणून वासुदेवाची ओळख आहे. सकाळच्या पारी हरिनामाचे नाव घेत सर्वांना झोपेतून उठवणारा वासुदेव असतो. आज मात्र ही लोककला लोप पावत चालली आहे, मात्र अशा परिस्थितीतही कला टिकवून ठेवण्याचे काम सांगलीमध्ये सुरू आहे.

पहाटेच्या सुमारास खेडोपाडी फिरून शिधा घेणारा आणि आपल्या सुमधुर वाणीतून सर्वांना देवांचे आठवण करून देणारा वासुदेव आज शोधण्याची वेळ आली आहे.

एकेकाळी वासुदेवाची वाट बघत बसणारे लोक आज वासुदेवाला विसरले आहेत.

खेडोपाडी पहाटे देवांचे अभंग म्हणत फिरणारा वासुदेव आला की त्या गावाची सकाळ होते.

मात्र आता इंटरनेट आणि विज्ञानाचे योगामध्ये नव्या पिढीला वासुदेवाचा विसर पडला आहे.

त्यामुळे आपली पारंपरिक कला जोपासण्यासाठी लोककलावंत धडपडत आहेत.

सांगलीत सुद्धा कित्येक महिन्यानंतर वासुदेवाचे दर्शन झालं.

सकाळच्या पारीला वासुदेवाचे सुमधुर आवाज आणि विठ्ठल नामाचा जप याचा आवाज कानावर पडल्यावर सांगलीकर जागे झाले.

वासुदेवाची आणखी एक ख्याती आहे, तो आपल्या सुमधुर वाणीतून देवाचे गीत गातोच; शिवाय लोकांना सुखदुःखाबाबत माहितीही देतो.

त्यामुळे वासुदेव भोवती नेहमीच महिलांचा बालगोपाळांचा गराडा असतो.

सांगलीत वासुदेव गल्लोगल्ली फिरत आहे.

कोणी त्याला पैसे देतात कोणी त्याला शिधा देतो तर कोणी त्याला कपडे देतं.

वासुदेवाला एखादी गोष्ट देऊन आपल्याबद्दल चांगला ऐकून घेण्याची उत्सुकता सर्वांना असते.

आपली ही कला लोप पावत चालली आहे. त्यामुळे आम्ही किमान सांगली कोल्हापुरात तरी ही कला जोपासत ठेवली आहे. त्यामुळे सर्वानी ही कला जिवंत ठेवण्यासाठी आम्हाला साथ द्यावी, असं या लोक कलावंताचे म्हणणे आहे.

सांगलीमध्ये महापुराचं संकट आल्यामुळे वासुदेवालाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. लोकांच्या समोर अडचणी असल्यामुळे त्यांना म्हणावी तशी शिधा, दक्षिणा मिळत नाहीय. तरीही सर्व काही चांगलं होईल. असा आशीर्वाद देऊन वासुदेव पुढच्या मार्गाला निघून जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *