Tue. Aug 9th, 2022

‘राज्यात इंधनावरील वॅट कमी करणार’

राज्यातील इंधनावरील कर लवकरच कमी करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. केंद्राने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केल्यानंतर आता राज्यातही इंधनावरील वॅट कमी करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतून तुफान फटकेबाजी करत मविआवर निशाणा साधला. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या.

राज्यात इंधनावरील वॅट कमी करण्यात येणार.

हिरकणी गाव वाचवण्यासाठी २१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्र सरकारने इंधनावरील दर कमी करण्यात आला. त्याच धरतीवर आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे या निर्णयामुळे राज्याच्या जनतेला मोठा फायदा होणार आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.