Jaimaharashtra news

या किनारपट्ट्यांना वायू चक्रीवादळाची भीती, सतर्कतेचा इशारा

राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे तर अजून काही भाग पावसाच्या  प्रतिक्षेत असताना हवामानखात्याकडून भारतीय समुद्रकिनाऱ्याच्या काही भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे.अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या  वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या भागांना धोका अधिक असल्याचे सांगितले आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरीकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

चक्रीवादळामुळे समुद्रकिनाऱ्यांवर सतर्कतेचा इशारा

राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे,मात्र हवामानखात्याकडून भारतीय समुद्रकिनाऱ्याच्या काही भागात सतर्कतेचा  इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे.

त्यामुळे निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला वायू असं नाव दिले आहे.  या दोन्ही राज्यांच्या किनारपट्टीच्या भागांना अधिक धोका असल्याचं सांगण्यात येत आहे.

याच कारणास्तव  हवामानखात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  12 ते 13 जून रोजी वायू वादळ किनारी भागावर धूमाकूळ घालण्याची शक्यता आहे.

110 किमी ते 135 किमी प्रति तासने वायू वादळ येवू शकेल.  यामुळे मुंबईत काही भागात जोराचा फटका बसण्याची शक्यता दर्शवली जाते.

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून हे वाद बुधवारी पुढे सरकण्याची चिन्ह दर्शवली जात आहे. या वायू’ चक्रीवादळाचा एकंदर प्रवास आणि वादळी वाऱ्यांचा वेग पाहता समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात राहणाऱ्या नागरीकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

Exit mobile version