विराट कोहलीच्या फिटनेसचं ‘हे’ आहे रहस्य

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या World Cupसाठी प्रचंड तयारी करत आहे. विशेष म्हणजे विराट स्वत:ला फिट ठेवण्यासाठी व्हिगन डाएट फॉलो करत आहे. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल हे व्हिगन डाएट म्हणजे काय ? तर व्हिगन डाएट हा इतर डाएट सारखा अजीबात नाही. यामध्ये तुम्हाला तुमच्या आहारातून दूध, दही आणि इतर डेअरी प्रोडक्टस् टाळावे लागतील. जाणून घ्या विराटचा व्हिगन डाएट.
काय आहे हे व्हिगन डाएट ?
कर्णधार विराट कोहलीने सध्या व्हिगन डाएट फॉलो करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
काही वर्षांपूर्वी वाढत्या वजनाला कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी विराटने विविध प्रकराचे डाएट फॉलो करण्यास सुरुवात केली.
विराटसह अनेक सामान्य व्यक्ती सुद्धा व्हिगन डाएट फॉलो करत आहे.
यामध्ये व्हिगन डाएट फॉलोअर्स शाकाहरी जेवणाला प्राधान्य देत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली व्हिगन डाएट फॉलो करत असून त्याच्या फिटनेस रहस्य आहे.
व्हिगन डाएट
व्हिगन डाएट म्हणजे शाकाहारी अन्नाला प्राधान्य देणे.
या डाएटमध्ये तुम्ही वनस्पती समृध्द अन्न, दुग्ध आणि प्राणी उत्पादन खाद्यपदार्थ खाऊ शकत नाही.
व्हिगन डाएट मध्ये लोकं दूध, दही आणि चीज यासारख्या दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत.
तर हिरव्या भाज्या, फळे, धान्य आणि फळे हे पदार्थांचे सेवन करतात.
व्हिगन डाएटचे प्रकार
होल- फूट व्हिगन डाएट
फळं, भाजी, संपूर्ण धान्य, बीन्स, अक्रोड आणि बिया अन्नधान्य व्हिगन डाएटमध्ये येतात.
रॉ-फूड व्हिगन डाएट
कच्ची फळं, भाज्या, अक्रोड, बियाणे आणि वनस्पती आधारित अन्न येतात.
हे पदार्थ साधारणपणे 118 डिग्री तापमानाखाली शिजवले जातात.
80/10/10 व्हिगन डाएट
या डाएटमध्ये कमी चरबीयुक्त पदार्थ जसं की, बदाम, एवोकॅडो, कच्च फळं आणि हिरव्या पालेभाज्या येतात.
स्टार्च घोल (Starch solution)
या डाएट प्रकारच्यामध्ये उच्च कार्बोहायड्रेट आणि शिजलेले स्टार्च असलेल्या शाहाकारी पदार्थांचा समावेश होतो.
यामध्ये बटाटा, भात आणि कॉर्न याचा समावेश केला जातो.
थ्राइव डाएट
हा डाएट वनस्पतींवर आधारित आहे.
४ वाजेपर्यंतचं रॉ- फूड
यात कमी चरबी असलेलं शाकाहारी आहार आहे.
जे रात्रीच्या जेवणानंतर शिजवून खाल्लं जातं.
दुपारी चार वाजेपर्यंत कच्चा खाद्य पदार्थांचं सेवन केलं जातं.