Mon. Jul 22nd, 2019

फक्त 10 रुपयांच्या वादातून दादरमध्ये भाजीवाल्याने केली ग्राहकाचा हत्या

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर एका भाजीविक्रेत्याने ग्राहकाचा खून केल्याची घटना घडली.

0Shares

मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाबाहेर एका भाजी विक्रेत्याने 10 रुपयांच्या वादातून  ग्राहकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.  24 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  या घटनेमुळे परिसरात खळबऴ उडाली आहे. भाजीविक्रेत्याचं नाव सोनी लाल असून तो फरार झाला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

नेमकं काय घडलं ?

भाजीविक्रेता आणि ग्राहक यांच्यात दादर स्टेशनबाहेर 10 रुपयांवरून वाद झाला.

हा वाद टोकाला गेल्याने भाजीविक्रेत्याने रागाच्या भरात ग्राहकाला चाकूने भोसकले.

जखमी झालेल्या ग्राहकाला तात्काळ KEM रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परंतु उपचारापूर्वीच ग्राहकाचा मृत्यू झाला.

मृताचे नाव मोहम्मद हनीफ असे आहे.

याप्रकरणी हत्येचा गुन्हा शिवाजी पार्क पोलिसांनी दाखल केला आहे.

भाजीविक्रेत्याने ग्राहकावर हल्ला केल्याचं समजताच पोलीस तेथे पोहोचले.

परंतु तेथे उपस्थित असलेल्या इतर भाजीविक्रेत्यांनी पोलिसांसोबतच वाद घालण्यास सुरुवात केली.

निव्वळ 10रुपयांसाठी झालेल्या वादामुऴे ग्राहकाला आपले प्राण गमवावे लागले.

भाजीविक्रेता फरार झाला असून आरोपीचा शोध शिवाजी पार्क पोलिसांचे एक पथक घेत आहे.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: