Fri. Jan 28th, 2022

अवकाळी पावसामुळे भाजीपाला महागला

   राज्यात थंडीच्या दिवसांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसांच्या सरींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काढणीला आलेले पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून याचा फटका ग्राहकांनाही बसत आहे. शेतपीकांचे नुकसान झाले असून भाजीपाला महागला आहे.

   बाजारांमध्ये टोमॅटोचा दर ८० ते १०० रुपये प्रति किलो झाला आहे. टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. तसेच मुंबईसह आसपासच्या शहरात होणारी टोमॅटोची आवक घटली आहे.

  बंगळूरयेथील वाशी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणारी टोमॅटोची आवक पूर्णपणे थांबली आहे. मागील आठवड्यात किरकोळ बाजारात ६० रुपये प्रातिकिलो मिळणारे टोमॅटोच्या दरांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे टोमॅटोची आवक आता मोठ्या प्रमाणात घटली आहे.

  तसेच अवकाळी पावसामुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यात सलग आठवडाभर पाऊस पडल्यामुळे ८० हजार एकरांपैकी ६५ हजार एकरांवरील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अवकाळी पावसामुळे ७० टक्के द्राक्षांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे द्राक्षांच्या किंमतीही वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *