Jaimaharashtra news

Video : ‘या’ माजी केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. या अपघातात अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागत आहे. दरम्यान नुकताच माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. हा  अपघात त्यांच्या ताफ्यातील सुरक्षा गाडीला झाला असल्याचे समोर आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यात जागीच दोन लोक ठार झाले आहेत. हंसराज अहीर हे चंद्रपूरहून नागपूरला जात होते. सकाळी 8.30 च्या सुमारास वर्ध्यातील जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यानंतर सुरक्षा गाडी एका कंटेनरला धडकली. त्यात दोन माणसांना जीव गमवावा लागला असून तीन माणसे गंभीर जखमी आहेत. या जखमींमध्ये वाहनाच्या चालकाचा समावेश असल्याचे समजले आहे. जखमींना ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात गाडी चक्काचूर झाली आहे.

Exit mobile version