Sun. Mar 7th, 2021

ज्येष्ठ संगीतकार जहुर खय्याम हाश्मी यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ संगीतकार जहुर खय्याम हाश्मी यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी जुहू येथील सुजॉय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘कभी कभी’, ‘उमराव जान’, ‘फिर सुबह होगी’, ‘पर्बत के उस पार’, ‘रजिया सुलतान’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे.

ज्येष्ठ संगीतकार जहुर खय्याम हाश्मी यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी जुहू येथील सुजॉय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘कभी कभी’, ‘उमराव जान’, ‘फिर सुबह होगी’, ‘पर्बत के उस पार’, ‘रजिया सुलतान’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. खय्याम यांना संगीत नाटक अकादमी अवॉर्ड, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या निधनाने अतिशय तरल अाणि भावस्पर्शी संगीत देणारा महान कलावंत आपण गमावला आहे , अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

खय्याम यांच्या अभिजात रचनांनी रसिकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. अनेक चिरंतन अजरामर ठरणाऱ्या रचनांमुळे खय्याम रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील. उमरावजान, कभी कभी, आखरी खत, रझिया सुलतान, नुरी अशा चित्रपटातील त्यांची काही गीते कालातीत आहेत. मिर्झा गालिब, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, निदा फाजली अशा श्रेष्ठ प्रतिभावंतांच्या महान रचनांना खय्याम यांनी पुरेपूर न्याय दिला.

एक कलावंत म्हणून खय्याम जेवढे महान होते तितकेच ते एक माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते. पद्मभूषण, फिल्मफेअर अनेक पुरस्कारांनी त्यांचा सार्थ गौरव झाला होता. अलिकडेच हृदयनाथ मंगेशकर यांच्या कार्यक्रमात त्यांची भेट झाली होती . त्यावेळी त्यांचे प्रशंसापर आशीर्वाद लाभले होते. ही भेट अखेरची ठरल्याचे मला मनस्वी दुःख आहे.

खय्याम यांनी त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त १२ कोटींची रक्कम केपीजे म्हणजे खय्याम प्रदीप जगजीत या संस्थेला दिली होती. ही रक्कम गरजू कलाकारांना मदत म्हणून वापरली जावी हा त्यामागचा हेतू होता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *