ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७८व्या वर्षी पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अनिल अवचट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. अनिल अवचट यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. आणि पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अनिल अवचट यांनी साहित्य विश्वासह समाजतही ओळख निर्माण केली. त्यांनी व्यसनमुक्त क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. व्यसनींना व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांनी व्यसनमुक्ती केंद्राची सुरूवात केली. १९६९मध्ये अनिल अवचट यांनी ‘पूर्णिया’ हे पहिले पुस्तक प्रसिद्ध केले. त्यांची ३८हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच त्यांनी सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले आहे. पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीची शोधलेली पद्धती जगभरातील व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये वापरली जाते.
Thanks for sharing, this is a fantastic article post.Really thank you! Really Cool.