Mon. May 10th, 2021

विहिंपच्या शोभायात्रेत एअर रायफल, तलवारी !

पिंपरी-चिंचवडमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विनापरवाना शोभायात्रा काढल्याप्रकरणी तसेच शोभायात्रेत एअर रायफल आणि तलवारी मिरवत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या शोभायात्रादरम्यान एअर रायफलची ट्रिगरही दाबण्यात आली असल्याचे समजते आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पिंपरी चिंचवडमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विनापरवाना शोभायात्रा काढली होती.

तसेच या शोभा यात्रेत एअर रायफल आणि तलवारी मिरवत होते.

शोभायात्रेत वापरण्यात आलेल्या एअर रायफलचे ट्रिगरही दाबण्यात आल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आले आहे.

यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकरांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही शोभायात्रा रविवारी सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजताच्या सुमारास काढण्यात आली होती.

शोभायात्रा पिंपरी- चिंचवडमधील यमुनानगर येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात आली होती.

या शोभा यात्रेत जवळपास 200 ते 250 कार्यकर्ते सहभागी झाले होते.

तसेच यामध्ये चार कार्यकर्त्यांच्या हातात एअर रायफल असल्यामुळे ट्रिगर दाबल्याने मोठा आवाज झाला.

त्याचबरोबर 5 कार्यकर्त्यांच्या हातात तलवारी दिसल्याने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *