मॉर्निंग वॉक करताना विहिंपच्या अध्यक्षाची हत्या

मॉर्निंग वॉक करत असताना नरेंद्र दाभोलकर तसंच गोविंद पानसरे यांसारख्या पुरोगामी नेत्यांची हत्या करण्यात आली होती. मात्र उत्तर प्रदेशात लखनौ येथे मॉर्निंग वॉक करत असताना विश्व हिंदू परिषदेचे (VHP leader killed in Lucknow) अध्यक्ष रणजीत बच्चन यांची आज हत्या झाली आहे.

रणजीत बच्चन रविवारी सकाळी 6.30 वाजता लखनौतील ग्लोब पार्क येथे फिरण्यासाठी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून येत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्यांच्याबरोबरचे दोन जणदेखील गंभीर जखमी झाले आहेत. तर बच्चन यांच्या डोक्यात गोळी लागल्याने ते जागीच मृत्यूमुखी पडले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पुरावे गोळा करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे. बच्चन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं.

Exit mobile version