उपराष्ट्रपती पदासाठी व्यंकय्या नायडू आणि गोपाळकृष्ण गांधी यांच्यात लढत
जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली
देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी मतदानाला सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झाली. मतदानानंतर संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
एनडीएचे व्यकय्या नायडू आणि यूपीएचे गोपाळकृष्ण गांधी यांच्या लढत होत आहे. तरी नायडू यांची निवड निश्चित मानली जात आहे.
दोन्ही सभागृहातील मिळून 790 सदस्य या निवडणुकीत मदतानाचा हक्क बजावणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे सध्या 439 सदस्य असून त्यात अन्य पक्षाची भर पडू शकते. नायडू हे किमान 550 मतं मिळवून विजयी होतील अशी अपेक्षा भाजपला आहे.