Mon. Jul 4th, 2022

विकी आणि कतरिनाचे लग्न ठरलं…

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहे. अशातच काही दिवसांपासून चर्चेत असलेली जोडी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ अखेर लग्नबंधनात अडकणार आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे ९ डिसेंबर रोजी राजस्थान येथे डेस्टीनेशन वेडिंग होणार आहे.

कतरीना आणि विकी यांच्या लग्नाची धावपळ सुरू झाली असून जयपूरच्या महालात त्यांच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. कतरिना आणि विकी यांच्या लग्नाला व्हिआयपी वऱ्हाडी येणार असल्यामुळे सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच कोरोना वाढता संसर्ग लक्षात घेता कोरोना नियम पाळून विकी आणि कतरीनाचा लग्न समारंभ पार पडणार आहे.

विकी आणि कतरीना यांची लग्नाची तयारी पूर्ण झाली असून कतरीना मेहंदीसाठी अबू जानीने डिझाईन केलेले कपडे तर संगीत सोहळ्यासाठी मनीष मल्होत्राने डिझाईने केले कपडे प्रधान करणार आहे. तसेच विकी कौशल कुणाल रावल आणि राघवेंद्र यांनी डिझाईने केलेल कपडे घालणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये विकी आणि कतरीना यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. तसेच त्यांचे लग्न होणार की नाही? असा प्रश्नही चाहत्यांना पडत होता. मात्र आता विकी आणि कतरीना यांच्या लग्नाची गोड बातमी चाहत्यांसाठी समोर आली आहे. येत्या ९ डिसेंबरला विकी आणि कतरिनाचे राजस्थान येथे डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.