Tue. Aug 20th, 2019

विकी कौशलचा शुटिंगदरम्यान अपघात

0Shares

एखाद्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान कलाकारांचा अपघात होणं, हे सिनेसृष्टीमध्ये काही नवीन नाही. आवश्यक ती खबरदारी घेऊनही कलाकारांना अशा अपघातांना सामोरे जावे लागते. असाच ‘उरी: द सर्जिकल स्ट्रइक’ या सिनेमाचा आघाडीचा अभिनेता विकी कौशल याला एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान अपघाताला फेस करावे लागले आहे. विकी कौशलच्या अशाच एका हॉरर सिनेमाचे सध्या शुटिंग चालू आहे. शुटिंग चालू असताना विकीच्या चेहऱ्यावर एक दरवाजा जोरात आदळला. हा दरवाजा इतक्या जोरात आदळला की या अपघातामध्ये त्याच्या चेहऱ्याला तब्बल 13 टाके लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमाचे शुटिंग चालू आहे, ते शुटिंग करत असताना दोन दिवसांपूर्वी हा अपघात झाला.

कसा झाला अपघात?

शुटींगदरम्यान हवी ती खबरदारी घेऊनही कलाकारांना अपघातांना सामोरे जावे लागते.

अशा अनेक घटना सिनेसृष्टीमध्ये घडत असतात. अशीच एक अनुभव उरी फेम विकी कौशललाही आला आहे.

एका हॉरर सिनेमाचे शुटिंग करताना हा अपघात झाला.

या सिनेमामधल्या एका एक्शन सीनचे शुटिंग चालू असताना विकीच्या चेहऱ्यावर दरवाजा जोरात आदऴला.

यामध्ये त्याच्या चेहऱ्याला जबर मार लागला आहे.

हा मार इतका जोरात होता की , त्याच्या चेहऱ्याचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.

यात त्याच्या चेहऱ्याला मोठी जखमही झाली आहे.

अशा अपघातांना सामोरे गेलेले ‘हे’ कलाकार

अमिताभ बच्चन-कुली

अमिताभ बच्चन यांच्यासोबत शुटिंगदरम्यान झालेला अपघात सगळ्यांनाच माहिती आहे.

‘कुली’ या सिनेमाच्या सेटवर त्यांना मोठा अपघात झाला होता.

या अपघाताने अमिताभ यांच्या फॅन्स वर्गाला खूप धक्का बसला होता.

या अपघाताने अमिताभ यांना पोटामध्ये जबर मार लागला होता.

त्यांच्या रिकव्हरीसाठी त्यांच्या फॅन्सनी बरेच होम-हवन, पूजा-अर्चा करण्यात आल्या होत्या.

त्या अपघातानंतर अमिताभ बच्चन यांनी फॅन्सचे मनापासून आभार मानले होते.

ऐश्वर्या राय-खाकी

असाच काहीसा अनुभव एका अभिनेत्रीलाही आला होता.

ऐश्वर्या राय असं त्या अभिनेत्रीचे नाव.

खाकी या अक्शन-ड्रामा सिनेमाच्या शुटिंगच्या वेळेस ऐश्वर्याला अपघात झाला होता.

या सिनेमामध्ये एक सीन होता, ज्यामध्ये तुषार कपूर आणि ऐश्वर्या चालत असताना त्यांच्या 20 फूटांच्या अंतरावर जीप येऊन उभी राहते.

पण त्या जीप चालकाचा ताबा सुटल्याने ती जीप सरळ ऐश्वर्याला धडकली होती.

या मोठ्या अपघातामध्ये तिच्या डाव्या पायाला फ्रॅक्चरही झाले होते.

ऋतिक रोशन-अग्निपथ

ऋतिक रोशनही अशाच एका अपघातातून गेला आहे.

‘अग्निपथ’ या त्याच्या रिमेक सिनेमाच्या शुटिंग दरम्यान तो एक स्टंट करत होता.

तो स्टंट शूट करत असताना त्याच्या पाठीला दुखापत झाली होती.

त्यामध्ये ऋतिकला MRI पर्यंत टेस्ट कराव्या लागल्या होत्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *