Fri. Aug 12th, 2022

‘विजयाचं चिन्ह दिसत आहे’ – जयश्री जाधव

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीसाठी पार पडलेल्या मतदानाची आज मतमोजणी सुरू आहे. पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत सुरूवातीपासूनच काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर आहेत. यावर, जयश्री जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. अण्णांच्या माघारी कोल्हापूरकरांनी आपली जबाबदारी पार पडली आहे. विजयाचे चिन्ह दिसत आहे. अण्णाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी निवडणुकीत उतरले आहेत, त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेन, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून रिंगणात असेलल्या उमेदवार जयश्री जाधव यांनी दिली आहे.

दरम्यान, मतमोजणीच्या सात फेरींमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्यासाठी तिन्ही पक्षांनी काम केलं, प्रचार केला. आम्हाला निवडून येण्याची अडचण वाटत नाही, जवळपास नऊ हजारांपेक्षा जास्त आघाडी आहे. तसेच यापुढच्या फेऱ्यांमध्ये आघाडी वाढत जाईल. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल महत्त्वाचा असतो, जनता काय कौल देईल ते आपल्याला चार तासात कळेल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.