Wed. Oct 5th, 2022

महाराष्ट्र दिनी विदर्भराज्य समितीचे आंदोलन

१ मे रोजी महाराष्ट्र दिनी विदर्भराज्य आंदोलन समिती महाराष्ट्र हटाओ विदर्भ बचाव आंदोलन करणार आहेत. या आंदोलनादरम्यान मलकापूर ते देवरी पर्यंत विदर्भातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आशयाचे स्टिकर आणि बॅनरदेखील लावण्यात येणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे बोर्ड लागले आहेत त्या ठिकाणी विदर्भ शासनाचे बोर्ड लावले जाणार आहेत.

नागपूर सह संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार आहे. विदर्भाचा मोठ्या प्रमाणात अनुशेष वाढला आहे, मात्र राज्य सरकार दुर्लक्ष करत आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत विदर्भातील जनतेचा विश्वाघात केला असून त्याचा निषेध म्हणून विदर्भवाद्यांनी एकत्रित येत हा संकल्प घेतला असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक माजी आमदार वामनराव चटप यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.