Wed. May 22nd, 2019

गडकरींविरोधात विदर्भवादी संघटना एकवटल्या!

0Shares

वेगेळ्या विदर्भ राज्याची मागणी जुनी आहे. मात्र या मागणीला काँग्रेसनेसुद्धा हुलकावणी देत राज्य केलं. भाजपने सत्तेत येण्याआधी वेगळ्या विदर्भ राज्यच अश्वसन दिलं. भुवनेश्वरच्या अधिवेशनात ठराव पास केला होता, मात्र ते सुद्धा हवेत राहिलं. त्यामुळे आता विदर्भवाद्यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरून काँग्रेस आणि भाजपला धडा शिकविण्याचा निर्धार केला आहे.

विदर्भाच्या मुद्द्यांवर लढणाऱ्या 11 संघटना आणि पक्ष एकत्रित आले आहेत.

लोकसभा आणि विधानसभेच्या सगळ्याच जागा लढवण्याच्या तयारीत आहेत.15 तारखेला तिकीट वाटपसुद्धा होणार आहे.

जनतेची भावना आमच्या सोबत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

आंदोलन करून फायदा झाला नाही, म्हणून निवडणुकीच्या माध्यमातून या पक्षांना धडा शिकवण्याची तयारी असल्याचं विदर्भवाद्यांचं म्हणणं आहे.

या ‘विदर्भ निर्माण मंचा’ने आपली तयारी जोरात सुरु केली आहे.त्यांच्यासोबत श्रीहरी अणे यांचा पक्ष सुद्धा आहे.

विदर्भाच्या नावाने लढणारे सगळे एकत्रित आल्याचा फायदा अनेक भागात होऊ शकतो.

चंद्रपूर जिल्ह्यात वामनराव चटप यांचं चांगलं नेतृत्व आहे तर इतर भागात सुद्धा यांनी तयारी सुरु केली.

विदर्भवादी निवडणुकीच्या रणांगणात उतरून खरंच या मोठ्या पक्षांना फक्त आणि फक्त जनतेच्या भावनेतून निवडणूक लढवणं आणि उमेदवार निवडून आणणं सोपं होईल का असे प्रश्न असले तरी विदर्भ वादी रिंगणात आहे. मात्र याचा काही  विशेष फायदा होणार नसल्याचं राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

वेगळ्या विदर्भाचं आंदोलन वेगवेगळ्या मार्गाने सुरु आहे मात्र त्याला मिळावा तसा राजकीय पार्टीवर दबाव निर्माण होताना दिसत नाही. त्यामुळे यांच्या निवडणूक लढण्याने दोन्ही पक्षाला थोडंफार नुकसान होईल मात्र फार फरक पडेल असं चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *