Sun. Jun 20th, 2021

विदर्भाचे पोट्टे ‘रणजी’ जिंकले ना बे!

विदर्भाने सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक या स्पर्धेचं विजेतापदक पटकावून स्थानिक क्रिकेटमध्ये स्वत:चं महत्त्व प्रस्थापित केलं आहे. फैज फैजलच्या नेतृत्वाखाली विदर्भाने सौराष्ट्रवर 78 धावांनी मात करून रणजी करंडक वर विजय पटकावला. फिरकीपटु आदित्य सरवटेने 6 फलंदाजांना मागे टाकत टीमला यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य केले. त्याने सामन्यात 11 बळी घेतले. या उत्तम कामगिरीनंतर विदर्भाच्या फैज फैजलने दिग्गज खेळाडुंच्या पंक्तीत स्थान निर्माण केलं.

 

विदर्भाच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

फैज फैजल हा दुसऱ्यांदा रणजी करंडक मिळवणारा एकमेव 11 वा फलंदाज ठरला.

विदर्भाने विजयप्राप्तीसाठी 207 धावांच आव्हान पार केलं.

सामन्यात प्रथमच फलंदाजी करणाऱ्या विदर्भाने पहिल्या डावात आदित्य कर्णेवारच्या गोलमाल खेळीवर जबरदस्त 312 धावांपर्यंत झेप घेतली.

स्नेल पटेलच्या शतकामुळे एका क्षणापर्यंत भक्कम वाटणारा विदर्भाचा संघ काही काळ गोंधळलाही होता.

पहिल्या फेरीत गणेश सतीश तर मधल्या फेरीत फलंदाजांपैकी मोहीत काळे, आदित्य सरवटे,अक्षय कर्णेवार, उमेश यादव यांनी लहान पण उत्तम खेळी रचल्या.

सौराष्ट्रचा संघ 127 धावांपुढे काही करू शकला नाही.

आदित्यला त्याचे सहकारी अक्षय वाखरेने 3 तर उमेश यादवने 1 बळी घेत अतुलनीय साथ दिली.

आदित्य सरवटेने विदर्भाच्या विजयात अमूल्य कामगिरी केली.

या उत्कृष्ट कामगिरीनंतर फैजलला प्रो. डी. बी. देवधर, बापू नाडकर्णी आणि अजित वाडेकर या दिग्गज खेळाडूंच्या बैठकीत स्थान मिळालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *