Wed. Jan 19th, 2022

Video: मुंबईत ग्रांट रोड येथे एका इमारतीला भीषण आग, 3 गंभीर जखमी तर 1 बेपत्ता

मुंबईच्या ग्रांट रोड परिसरात असलेल्या आदित्य आरकेड इमारतीला  सकाळी 6 ते 7 च्या सुमारास आग लागली. या आगीची तीव्रता 3 श्रेणी इतकी आहे . या आगीत 8 ते 10 रहिवासी अडकले होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे.

मुंबईच्या ग्रांट रोड परिसरात असलेल्या आदित्य आरकेड इमारतीला  सकाळी 6 ते 7 च्या सुमारास आग लागली. या आगीची तीव्रता 3 श्रेणी इतकी आहे . या आगीत 8 ते 10 रहिवासी अडकले होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे कुलिंग ऑपरेशन चालू आहे. या आगीत 3 जण गंभीर जखमी झाले असून तिघांवरही जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  दिलीप चौधरी (40) ,अशोक चौधरी (23), भारत चौधरी (23) अशी जखमींची नावे आहेत. यामध्ये आणखी एकजण बेपत्ता आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोधकार्य सुरू असून धुरामुळे व अति उष्णतेमुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *