राणा दाम्पत्याचा व्हिडिओ पोलिसांकडून प्रसारित

खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित धक्कादायक आरोप केले आहे. कोठडीत जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळाली असून त्यांचा अमानुष छळ केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. तसेच रात्रभर पिण्यासाठी पाणी दिले नाही, असेही त्या पत्रात म्हणाल्या. दरम्यान, राणा दाम्पत्याचा व्हिडिओ पोलिसांकडून प्रसारित करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी व्हिडिओद्वारे नवनीत राणा यांचा पोलीस कोठडीत छळ केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. या व्हिडिओमध्ये राणा दाम्पत्य चहा पिताना दिसत आहेत. तसेच त्यांना पाणीदेखील देण्यात आले आहे. त्यामुळे आता कोण खरं आणि कोण खोटं, असा सवाल उपस्थित होत आहे.
Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022
काय आहेत नवनीत राणांचे आरोप?
नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहित धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांना कोठडीत जनावरांपेक्षा वाईट वागणूक मिळाली असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी पत्राद्वारे केला आहे. तसेच माझा अमानुषपणे छळ केला जात आहे, तर मी अनुसूचित जातीची असल्यामुळे माझा छळ होत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी पत्राद्वारे केला आहे.
तसेच त्यांनी लिहिले की, ‘मी पिण्यासाठी पाणी मागितले मात्र, मला रात्रभर पाणी दिले नाही. तसेच आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची असल्यामुळे मला पाणी पिण्याचा मुलभूत अधिकार नाकारण्यात आला.’ असेही त्यांनी पत्रात नमूद केले.