Thu. May 13th, 2021

विधानसभा निवडणुक: ‘या’ उमेदवारांची बंडखोरी कायम

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली. शिवसेना – भाजपामध्ये झालेली युती तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी यामुळे अनेक उमेदवारांना धक्का बसला आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली. शिवसेना – भाजपामध्ये झालेली युती तसेच काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी यामुळे अनेक उमेदवारांना धक्का बसला आहे.  याचा परिणाम म्हणजे राज्यात बंडखोरीचे प्रमाण वाढल्याचे चित्र होते.  यापैकी काही जणांनी आपला अर्ज मागे न घेता बंडखोरी कायम ठेवली आहे.

या मतदारसंघात बंडखोरी

चिंचवड विधानसभा मतदारसंघ –  मतदारसंघात पुन्हा भाजपचे लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यात सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने राष्ट्रवादी कलाटे यांना पुरुस्कृत करण्याची दाट शक्यता आहे.

सांगोला विधानसभा मतदारसंघ – शेकाप एनसीपी आघाडी, राष्ट्रवादीचे उमेदवारी बंडखोर दिपक साळुखे यांनी बंडखोरी केली आहे, येथे शेकापकडून अनिकेत देशमुख हे उमेदवार आहेत.

करमाळा विधानसभा मतदारसंघ – शिवसेना बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांनी बंडखोरी केली आहे. इथं शिवसेना उमेदवार रश्मी बागल लढणार आहेत.

कल्याण पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदासंघ – कल्याण पूर्व आणि पश्चिमेच्या बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतला नाही. भाजप आमदार नरेंद्र पवार यांची बंडखोरी कायम असून शिवसेनेच्या विरोधात दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला. नरेंद्र पवार कल्याण पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. राज्यातील एकमेव जागा जिथं भाजपने त्यांच्याच विद्यमान आमदाराचे तिकीट कापुन सेनेला उमेदवारी दिली आहे.

बार्शी विधानसभा मतदारसंघ – शिवसेनेचे दिलीप सोपल भाजप यांनी बंडखोरी केली आहे. भाजपचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्याविरोधात त्यांची लढत आहे.

शिरोळ विधानसभा मतदारसंघ – आघाडीत बिघाडी झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र पाटील यांनी बंडखोरी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकार मादनाईक यांच्याविरोधात अर्ज दाखल केला आहेत.

पालघर विधानसभा मतदारसंघ – शिवसेनेचे अमित घोडांनी सेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, परंतु आत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ – शिवसेनेचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या विरोधात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघ – भाजपाचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्या होणार लढत होणार आहे.

कागल विधानसभा मतदारसंघ – शिवसेना उमेदवार संजय घाटगे यांच्याविरोधात भाजपचे बंडखोर उमेदवार समरजीत घाटगे यांनी बंडखोरी केली आहे

औरंगाबाद पश्चिममध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध, भाजपचे बंडखोर राजू शिंदे यांनी दंड थोपटले आहेत.

बीड विधानसभा मतदारसंघ – गेवराई मतदारसंघात शिवसेनेची बंडखोरी कायम बदामराव पंडित यांनी बंडखोरी केली आहे. भाजप उमेदवार लक्ष्मण पवार यांच्या विरुद्ध शिवसेनेचे बदमराव पंडित यांनी अर्ज दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *