Sat. Jun 6th, 2020

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आघाड्या, युतीच्या बैठका, चर्चा सुरु

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलंय. निवडणूक आयोगाने यासंदर्भात घोषणा केली असून 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होईल.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजलंय. निवडणूक आयोगाने यासंदर्भात घोषणा केली असून 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होईल. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. राजकीय पक्ष निवडणुकांच्या दृष्टीकोनातून तयारी करत आहेत. राज्यभरात राज्यात आघाड्या आणि युतीच्या बैठका चर्चा सुरू आहेत.

सध्या काय परिस्थीती

भाजप-सेना- युतिचा फार्मुला ठरलेला नाही. जागावाटपावर एकमत नाही मात्र बोलणी अंतिम टप्प्यात आहे. असं बोललं जात आहे. लवकरचं युतीच घोषणा होण्याची शक्यता आहे.

कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी दोन्ही पक्ष प्रत्येकी 125 जागांवर लढणार आहे. उर्वरीत 38 जांगावर स्वाभिमानी,पिरीपा,गवई गटासह इतर मित्र पक्षांना सोडणार आहेत.

वंचित बहूजन आघाडी- MIM सोबत आघाडी फिस्कटली असून त्यामुळे वंचित बहूजन आघाडी स्वबळावर निवडणूका लढवण्याची शक्यता आहे.

मनसे- मोजक्या जागावर निवडणूक लढवण्यास राज ठाकरे अनूकूल आहेत. मात्र अजूनही अंतिम निर्णय जाहीर केलेलं  नाही.

रिपाई (आठवले)- भाजपकडे १० जांगाची मागणी करण्यात आली आहे. तसेच ते स्वता:च्या चिन्हावर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटना- कॉग्रेस- राष्ट्रवादी आघाडीत सहभागी होणार आहे. मात्र जागा वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *