विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांनी होणार – सूत्र

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज झाली आहेत. विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांनी होण्याची शक्यता असल्याचे जय महाराष्ट्राच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात सर्व मतदारसंघात मतदान होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुका लवकरच पार पडणार –

विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली असून राजकीय पक्ष सज्ज झाली आहेत.
विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांनी होण्याची शक्यता जय महाराष्ट्राला सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रसह इतर राज्यातही विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांनी करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे.
मात्र त्यापूर्वी निवडणूक आयोगाने शिष्टमंडळ महाराष्ट्रात येऊन परिस्थितीची पाहणी करणार असल्याची माहिती समोर आल आहे.
तसेच महाराष्ट्रात एकाच टप्प्यात सर्व मतदारसंघात मतदान होणार आहे.
22 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात नवीन विधानसभा अस्तिवात येणे गरजेचे असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 31 दिवस आवश्यक असल्यामुळे सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा होणार आणि त्यानंतर आचारसंहिता लागू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Exit mobile version