Tue. Sep 28th, 2021

विधानभवनाच्या कॅंटिनमध्ये मटकीच्या उसळीत सापडले ‘चिकनचे तुकडे’

विधानभवनच्या कॅंटिनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळ्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनोज लाखे यांनी विधानभवनाच्या कॅंटिनमधून जेवणाची थाळी मागवली होती. जेवत असताना अचानक मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे सापडल्याने त्यांना मोठा धक्का बसला. मनोज लाखे यांनी यासंदर्भात विधानसभा सचिवाकडे तक्रार केली आहे.

 नेमकं काय घडलं ?

विधानभवनच्या कॅंटिनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे सापडले आहेत.
मनोज लाखे यांनी विधानभवनच्या कॅंटिनमधून जेवणाची थाळी ऑर्डर केली होती.
जेवताना अचानक मटकीच्या उसळीमधून चिकनचे तुकडे सापडले.
वेज जेवणात नॉन वेजचे तुकडे सापडल्याने कॅंटिनच्या कंत्राटदारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मनोज लाखे सहकार विभागात अधिकारी असून त्यांनी विधानसभेच्या सचिवांकडे तक्रार केली आहे.
या कॅंटिनमध्ये आमदार, अधिकारी नियमितपणे जेवत असल्याचे समजते आहे.
त्यामुळे या कॅंटिनच्या स्वच्छेतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *