Thu. Jan 27th, 2022

सुनेचे विवाहबाह्य संबंध, विद्या चव्हाण यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि नेत्या विद्या चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला आहे. माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचं वक्तव्य विद्या चव्हाण यांनी केलं आहे.

यासर्व प्रकरणासंबंधीत विद्या चव्हाण यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहेत.

काय म्हणाल्या विद्या चव्हाण ?

माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे समजल्यानंतर माझ्या मुलाने घटस्फोटाची तयारी सुरू केली.

यानंतर सुनेने खोटे आरोप केले आहेत. पण हे सर्व आरोप न्यायालयात सिद्ध होतील असं विद्या चव्हाण म्हणाल्या.

अधिक वाचा : सुनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांविरोधात गुन्हा

मी 30 वर्षांपासून गोरगरबांसाठी, महिलांसाठी लढतेय. माझा मुलगा इंजिनियर आहे.

कंपनीतर्फे माझ्या मुलाला त्याच्या पत्नी आणि 5 वर्षाच्या मुलीबरोबर डेन्मार्कला पाठवत होती.

त्या दरम्यान त्याची पत्नी, माझी सून गौरीच्या मोबाईल मधून काही धक्कादायक माहिती पुढे आली असल्याचं विद्या चव्हाण म्हणाल्या.

दरम्यान विद्या चव्हाण यांच्या सुनेने त्यांच्या चव्हाण यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ..

भाजपचा सवाल

या सर्व प्रकरणावरुन भाजपने खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री यशोमती ठाकूर यांना प्रश्न केला आहे.

खासदार सुप्रिया सुळे ताई आणि महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर ताई सुनेचा छळ करणाऱ्या तुमच्या सहकारी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात तुम्ही भूमिका घेणार की नाही ? असा सवाल भाजपने केला आहे.

यासंदर्भात भाजपने एक ट्विट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *