बहुप्रतीक्षित ‘जंगली’ सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता विद्युत जामवालच्या बहुप्रतीक्षित जंगली सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.

रिलीज झालेला ट्रेलर अॅक्शनपॅक्ड असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा ट्रेलर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हा चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर या सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे.

या ट्रेलरमध्ये सुरुवातीला चित्रपटातील पात्रांची ओळख करुन देण्यात येत आहे. या चित्रपटात विद्युतने एका पशुचिकित्सकाची भूमिका साकारली असून त्याच्या मित्राचे म्हणजे हत्तीचे नाव ‘भोला’ असल्याचे पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे या सिनेमाध्ये विद्युतव्यतिरिक्त अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री पूजा सावंत हे 2 मराठी कलाकारही झळकले आहे.

या सिनेमात पुजा सावंतने ‘शंकरा’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे, तर अतुल यांनी हत्तींची शिकार करणाऱ्या शिकारीची भूमिका साकारली आहे.

दरम्यान या ट्रेलरमधून माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचं दर्शन घडविण्यात येत आहे. मंगळवारी या सिनेमाचं पोस्टरही रिलीज करण्यात आलं.

या सिनेमातून हस्तीदंतांच्या तस्करीसाठी हत्तींची होणारी शिकार, या रॅकेटचा आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेला संबंध या साऱ्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

त्यामुळे या सिनेमामध्ये नाट्यमय घडामोडी आणि अॅक्शन दिसून येणार आहे.

‘जंगली पिक्चर्स’ची निर्मिती असलेला हा सिनेमा दिग्दर्शक चक रसेल यांनी दिग्दर्शित केला आहे.

हा सिनेमा येत्या 5 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version