Tue. Oct 26th, 2021

‘या’ अभिनेत्याने वाटले विविध शहरांत 9 ट्रक भरून आईस्क्रीम्स!

आपल्या वाढदिवसानिमित्त मोठमोठे स्टार्स पार्ट्या करताना दिसतात. काही सुपरस्टार्सच्या घराबाहेर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारोंची गर्दी उसळते आणि या गर्दीला हे सुपरस्टार्स अभिवादन करून शुभेच्छा स्वीकारतात. मात्र तेलुगू सिनेमा ‘अर्जुन रेड्डी’ मुळे तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेला सुपरस्टार विजय देवरकोंडा याने मात्र आपला बर्थडे वेगळ्या ढंगात साजरा केला.

30 वा वाढदिवस असा केला साजरा!

9 मे रोजी विजय देवरकोंडा याचा 30वा वाढदिवस होता.

आपल्या वाढदिवशी विजयने आपल्या फॅन्सना हटके पद्धतीने आईस्क्रीम पार्टी दिली.

उन्हाळ्याच्या दिवसांत लोकांना खायला आवडणारी गोष्ट म्हणजे आईस्क्रीम.

विजय देवरकोंडाने हाच विचार करून वेगवेगळ्या राज्यांतल्या विविध शहरांत एक –दोन नव्हे, तर चक्क 9 ट्रक्स भरून आईस्क्रीम्स वाटले.

हैदराबाद, तिरूपती, विजयवाडा, चेन्नई, बंगळुरू, कोची इत्यादी शहरांमध्ये लोकांना आईस्क्रीम्स वाटून आपल्या बर्थड़ेची पार्टी दिली.

हैदराबाद येथे त्याने स्वतः लोकांना आईस्क्रीम्स वाटप केलं.

कोण आहे विजय देवरकोंडा?

तेलुगू सिनेमांतील नव्या जनरेशनच्या स्टार्समध्ये सर्वांत वेगाने लोकप्रिय होत असलेला आणि वेगळ्या धाटणीचे सिनेमे करणारा अभिनेता अशी विजय देवरकोंडाची ओळख आहे.

अर्जुन रेड्डी, गीता गोविंदम, टॅक्सी ड्रायव्हर, पेली चुपूलू, महानटी अशा सिनेमांमधून त्याने अमाप लोकप्रियता मिळवलीय.

‘Under 30 सर्वाधिक श्रीमंत कलाकारां’च्या फोर्ब्स यादीतही त्याचं नाव झळकलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *