विजय माल्ल्याला स्कॉटलंड पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर अवघ्या काही तासांत जामीन मंजूर
वृत्तसंस्थ, नवी दिल्ली
देशातील बँकांचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी लंडनमध्ये विजय मल्ल्याला बेड्या ठोकल्या. पण मल्ल्याला वेस्टमिन्स्टर कोर्टानं मल्ल्याला जामीन मंजूर केला आहे.
विजय मल्ल्याला भारताच्या सुचनेवरुनच बेड्या ठोकल्याचं म्हटलं जातंय. त्याबरोबरच त्याला आता भारतात परत पाठवण्याचीही शक्यता आहे.
सीबीआयची टीम लंडनमध्ये जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. कर्जबुडव्या विजय मल्ल्यानं देशातल्या विविध बँकांची तब्बल 9 हजार कोटींची कर्ज बुडवली आहेत.