Mon. Jul 26th, 2021

VG सिद्धार्थ यांचा मृत्यू, विजय मल्ल्याचा सरकारवर निशाणा!

हजारो कोटींचं कर्ज बुडवून विदेशात पळालेल्या विजय मल्ल्या याने CCD चे संस्थापक VG सिद्धार्थ यांच्या मृत्यूनंतर अनेक Tweets केली आहेत. सिद्धार्थ यांच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त करतानाच सरकारवर निशाणा साधला आहे.

कॅफे कॉफी डेचे संस्थापक 59 वर्षीय व्हीजी सिद्धार्थ हे 2 दोन दिवसांपूर्वी मंगळुरू येथून बेपत्ता झाले होते. आज बुधवार रोजी त्याचा मृतदेह नेत्रावती नदीत मिळाला. सिद्धार्थ कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई होते. त्यांच्या मृत्यूनंतर विजय मल्ल्या याने सरकारला दोषी ठरवत कर्जात अडकलेल्या उद्योगपतींना मदत न केल्याचा आरोप केला आहे.

 

मल्ल्या याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे, की ‘माझा अप्रत्यक्षरीत्या VG Siddharth यांच्याशी संबंध होता. ते एक चांगले व्यक्ती आणि उत्तम उद्योजक होते. त्यांनी पत्रात लिहिलेल्या गोष्टींनी मी अजूनही अस्वस्थ आहे. सरकारी एजंन्सी आणि बँका कोणालाही निराशेच्या गर्तेत ढकलू शकतात. पहा, मी पूर्ण payment करायची ऑफर दिली असूनही माझ्यासोबत काय घडतंय. लबाड आणि निर्दयी ’

भारतातील आणि परदेशातील कर्ज घेतलेल्या लोकांची मल्ल्याने तुलना केली. Tweetमध्ये त्याने लिहिलंय. ‘पाश्चात्य देशांत सरकार बँकेचं कर्ज फेडण्यासाठी उधार घेणाऱ्यांना मदत करतं. माझ्या केसमध्ये ते मला कर्ज फेडता येऊ नये म्हणून हरतऱ्हेच्या अडचणी आणत आहेत आणि माझ्या संपत्तीसाठी आपसांत भांडत आहेत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *