विजय वडेट्टीवार विधानसभेचे नवे विरोधी पक्ष नेते

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांना विधानसभेत राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात विधानसभेत विरोधी पक्ष पदाची जागा रिक्त आहे. त्यामुळे सोमवारी विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यात आली आहे.

विधानसभेचे नवे विरोधी पक्ष नेते –

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेते पदी निवड करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते असल्याची घोषणा केली.

राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला.

त्यामुळे तेव्हापासून विरोधी पक्ष नेत्याची जागा रिक्त होती.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.

मात्र त्यावरूनही विरोधकांनी आक्षेप घेत घटनानुसार चुकीचं असल्याची टीका केली आहे.

कोण आहेत विजय वडेट्टीवार ?

1980-1981 – एनएसयूआयसह कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकीर्द सुरू

 

1991 -1993 – जिल्हा परिषद गडचिरोलीचे जिल्हा सल्लागार

1991 -1998 – महाराष्ट्र उपक्रमांचे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष

1998-2004 – विधान परिषदेचे महाराष्ट्र (एमएलसी) सदस्य

2004-2009- चिमूर मतदारसंघातून विधानसभा सदस्य

2008-2009- सिंचन, आदिवासी कल्याण, पर्यावरण आणि वन राज्यमंत्री

2009 -2010- आमदार म्हणून पुन्हा चिमूर मतदारसंघातून निवड

2009-2009 नोव्हेंबर- सिंचन, ऊर्जा, वित्त आणि नियोजन राज्यमंत्री

2010-2011- अध्यक्ष, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, चंद्रपूर

 

2008-2011- संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई

 

2014 – वर्तमान आमदार म्हणून निवड

 

1980 -2014 – 34 वर्षपासून ब्रह्मपूरी मतदारसंघ भाजप आणि स्वतंत्र आमदार

सध्या महाराष्ट्र विधानसभा सदस्य विधानसभा

 

ओ.बी.सीचे सदस्य समिती, महाराष्ट्र

Exit mobile version