Tue. Oct 19th, 2021

विकासच्या बॉक्सिंग करिअरवर टांगती तलवार

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

भारतीय बॉक्सर विकास कृष्णनसाठी वर्ल्ड सीरिज ऑफ बॉक्सिंग स्पर्धेचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

 

विकासने ताश्कंदमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीतून माघार घेतली होती. ही माघार त्याने का घेतली ते कारण मात्र स्पष्ट होऊ शकलं नाही.

 

दरम्यान, भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या शिस्तपालन समितीने यासंदर्भात विकासकडून स्पष्टीकरण मागितलं. तसंच या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचंदेखील भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंग यांनी सांगितलं.

 

त्यामुळे विकासला चौकशी समितीला सामोरे जावं लागणार असल्याने 11 मे रोजी वर्ल्ड सीरिजमध्ये होणाऱ्या लढतीत त्याच्या सहभागाची शक्यता कमीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *