Mon. Sep 27th, 2021

नगरच्या जागेचा संघर्ष मुलासाठी नसून आघाडीसाठी : विखे-पाटील

लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात नगरच्या जागेवर चांगलांच संघर्ष होत असताना दिसत आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील याने भाजपामध्ये प्रवेश केल्याने राजकिय हालचालींना वेग आला आहे.तर यावरती  राधाकृष्ण विखे पाटील यांची काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष होते. आज पत्रकार परिषद घेवून  विखे यांनी आपले म्हणणे मांडले आहे.

सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, तो त्याचा वैयक्तिक निर्णय होता.असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.तसेच अहमदनगरमध्ये प्रचाराला जाणार नाही अशी घोषणा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. शरद पवार यांनी बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबद्दल  केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विखे पाटलांची भूमिका नेमकी काय?

सुजयने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला, तो त्याचा वैयक्तिक निर्णय

नगरच्या जागेवर हा सर्व संघर्ष माझ्या मुलासाठी हातोय हे चुकीचं

राष्ट्रवादीचा नगरमध्ये सलग तीन वर्ष पराभव झाल्याने हि जागा काँग्रेसला मिळावी

जागा वाटपाच्या चर्चेमध्ये माझ्या मुलाने वेगळ्या पक्षात जावं अशी चर्चा नाही.

विरोधीपक्ष नेता या नात्याने आपल्याकडून चुकीचे विधान होऊ नये याची माझ्यावर जबाबदारी होती.

शरद पवारांवर विखेंची नाराजी

पवारांनी 1991 च्या निवडणुकीचा दाखला देत, बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव केल्याचं विधान केलं होत .

आघाडीत सदस्य असताना आणि आमचे वडील हयात नसताना त्यावर टिपण्णी करणे पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभणारं नव्हतं.

सध्याच्या निवडणुकीपूर्वीच त्यांचं हे वक्तव्य दु:ख देणारं आहे.तसचं शरद पवारांच्या मनात माझ्या वडिलांबाबत द्वेष आहे. असं मत विखे यांनी व्यक्त केलं

माझ्या वडिलांबाबत बोलणाऱ्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्रचार नगरमध्ये का करु”, असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *