Wed. Jun 26th, 2019

विखे पाटील यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

0Shares

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पक्षाने कोंडी केली होती आणि प्रक्रिया घडल्या त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडत आहे असं मत विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. विधानभवनात विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडं सोपवला आहे. विधानसभा सदस्याचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली गिरीष महाजन यांची भेट घेतली आहे. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला चांगलाच धक्का लागला आहे.

राजीनाम्यानंतर विखेंची ही भूमिका

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

विधानभवनात विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. त्यांनी आपला राजीनामा त्यांच्याकडं सोपवला आहे.

पक्षात माझी घुसमट सुरू होती म्हणून राजीनामा देत आहे असं ते म्हणत आहेत.

माझ्या सोबत कोणीही आमदार येणार नाही ते आमदार सक्षम आहेत. असं ही ते म्हणाले आहेत.

केंद्रात गेलो तरी येत्या विधानसभा निवडणुकीत माझी भूमिका ही महत्वाची असेल असं मत त्यांनी मांडलं.

राजीनाम्यानंतर घेतली गिरीश महाजनांची भेट

राजीनाम्यानंतर नगरमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट घेतली.

त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकिय वर्तुळात होत आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: