Fri. Dec 3rd, 2021

लँडर एखाद्या सावलीत आणि धुळीमध्ये असल्याने दिसत नाही – NASA

ISRO आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले मोहिम म्हणजे चंद्रयान-2 बाबत नवीन माहिती समोर आली आहे. NASAच्या ऑर्बिटरने विक्रम लॅंडरचे उच्च रिझोल्यूशन प्रतिमेचे फोटो कॅप्चर करून पाठवले आहेत. विक्रम लॅंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वेगाने खाली आल्याने विक्रमचे चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाल्याचे NASAने स्पष्ट केले.

NASAकडे विक्रम लॅंडरची माहिती –

NASAच्या ऑर्बिटरने ज्या ठिकाणी विक्रम लॅंडर आहे तिथले काही फोटो पाठवले आहेत.

NASAच्या ऑर्बिटरने उच्च रिझोल्यूशन प्रतिमेचे फोटो कॅप्चर करून पाठवले आहेत.

विक्रम लॅंडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वेगाने खाली आल्याने विक्रमचे चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाल्याचे NASAने स्पष्ट केले.

NASAने विक्रम लॅंडरचे अजूनही कोणतेही फोटो प्रसिद्ध केले नाहीत.

चंद्रावर रात्र असल्याने पृष्ठभागावर फक्त छाया दिसू शकते.

यामध्ये लँडर एखाद्या सावलीत आणि धूुळीमध्ये असल्याने दिसत नाही, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

NASA ऑक्टोबरपर्यंत आणखी काही फोटो प्रसिद्ध करू शकतील असे आश्वासन दिले आहे.

काय घडले विक्रम लॅंडर सोबत ?

22 जुलै रोजी चांद्रयान -2 अवकाशाच्या दिशेने निघाले.

काही तांत्रिक अडथळ्यांमुळे विक्रम लॅंडरशी संपर्क तुटला.

विक्रम लॅंडरशी पुन्हा संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न इस्त्रो करत होता.

त्यानंतर इस्त्रोने NASAची मदत घेतली.

इस्त्रोच्या ऑर्बिटर बरोबरच NASAचे ऑर्बिटरही विक्रमला शोधत होते.

नंतर NASAने काही फोटो पाठवले. यात विक्रम विक्रम लॅंडर अजुनपर्यंत दिसलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *