Jaimaharashtra news

हृतिक रोशन आणि सैफ अली खान हे लवकरच झळकणार या चित्रपटात

मुंबई : दक्षिण भारतीय हिट तमिळ चित्रपट विक्रम वेधा हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यात विजय सेतुपती याने ‘वेधा’ ही मुख्य भूमिका साकारली होती आणि त्याचबरोबर आर माधवन याने प्रामाणिक पोलीस अधिकारी ‘विक्रम’ याची व्यक्तीरेखा साकारली होती.

‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकचा जेव्हा विचार सुरू झाला तेव्हा सर्वात पहिल्यांदा वेधाच्या भूमिकेसाठी आमिर खानचा विचार केल्या गेला होता. मात्र आता ही भूमिका ह्रतिक रोशनला साकारायला मिळाली आहे. या चित्रपटात सैफ अली खान याला विक्रमची भूमिका मिळाली असून इतर कलाकारांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही. आर. माधवन आणि विजय सेतुपती याची मूळ भूमिका असलेल्या ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमधील नायकांची नावे आता स्पष्ट झाली आहेत. या बॉलिवूड चित्रपटामध्ये सैफ अली खान आणि हृतिक रोशन मुख्य भूमिका साकारणार असल्याचं निर्मात्यांनी जाहीर केलं आहे.

कोविडमुळे उशीर झालेला चित्रपटाचे शूटिंग पुढील काही आठवड्यात सुरू होणार असून 30 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय हा निर्मात्यांनी घेतला आहे. या दरम्यान, हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची भूमिका असेल्या फाइटर चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. हा चित्रपट भारतातील पहिला एरियल अॅक्शन फ्रेंचायझी चित्रपट आहे. सैफ अली खानचा नवा चित्रपट ‘भूत पोलीस’ आहे. याचे पवन कृपालिनी दिग्दर्शक असून यात अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम या कलाकारांच्या भूमिका आहेत.

Exit mobile version