Wed. Jun 19th, 2019

विक्रोळीत फुटपाथवर झोपलेल्या दोन महिलांसहित लहान मुलाचा टँकरखाली चिरडून मृत्यू

0Shares

विक्रोळी येथे अपघातात टँकर खाली झोपलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला. लहान मुलग्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. विक्रोळीतील पार्क साईट परिसरात शनिवारी रात्री हा विचित्र अपघात झाला आहे. लक्ष्मी वाघमारे 50, सायम्मा वाघमारे 15  आणि कार्तिक वाघमारे 3 या अपघातात चिरडले गेले. लक्ष्मी आणि सायम्मा जागीच ठार झाल्या तर कार्तिकचा राजवाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

विक्रोळीत विचित्र अपघात

रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या टँकर खाली दोन महिला आणि एक लहान मुलगा असे तीन जण झोपले होते.

रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्या टँकर च्या मागे आणखी एक टँकर पार्क केला जात होता

टँकर पार्क करत असताना चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील टँकर धडक दिली.

उतार असल्याने पार्क केलेले टँकर पुढे जाऊ लागले आणि यात त्या टँकर खाली झोपलेले तिघे जण चिरडले गेले.

लक्ष्मी वाघमारे, सायमा वाघमारे अशी या महिलांची नावे आहेत. तर कार्तिक वाघमारे (वय ३) असे मुलाचे नाव आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.रात्री उशिरा या भागामध्ये स्थानिक रहिवाश्यांनी गर्दी केली होती.

या दुर्घटनेनंतर टॅंकर चालकाने तिथून पळ काढला .पण विक्रोळी पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली असल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान दोन्ही टॅंकर पोलिसांनी जप्त केले आहेत.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: