Sun. Jun 20th, 2021

कुत्रा चावला म्हशीला, रेबिज साऱ्या गावाला?

कुत्रा चावण्याची भीती बऱ्याच जणांना असते. मात्र कुत्र्याच्या भीतीने संपूर्ण गावानेच दवाखाना गाठल्याची घटना कोल्हापुरातील शिये गावात घडली आहे. विशेष म्हणजे उपचारासाठी डॉक्टरांकडे धावलेल्या एकाही व्यक्तीला प्रत्यक्षात कुत्रा चावला नव्हता, नेमकं काय घडलं होतं मग?

कुत्रा चावला म्हशीला…

कोल्हापूरपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावरील हनुमान नगर भागात शेतकऱ्यांच्या म्हशीला पिसाळलेला कुत्रा चावला.

त्यामुळे या म्हशीचा रेबीज होऊन मृत्यू झाला.

या म्हशीच्या दुधाचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये मात्र या बातमीमुळे भीती निर्माण झाली.

या म्हशीचं दूध वापरणाऱ्या 200 जणांनी या प्रकाराने घाबरून दवाखान्यात धाव घेतली आणि स्वतःला रेबिजची लस टोचून घेतली.

यासंदर्भात शासकीय विभागाला समजताच आरोग्य अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं.

या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचं प्रबोधन करत जर दूध उकळून वापरलं असल्यास भीतीचं कारण नसल्याचं स्पष्ट केलं.

मात्र जर दूध न उकळताच वापरलं असेल, तर मात्र रेबिज प्रतिबंधक लस गरज असल्याचं म्हटलं.

त्यानंतर गावातील लोकांचं शंका निरसन झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *