नारायण राणेंचे स्नेहभोजन भाजपला पचणार नाही – विनायक राऊत
जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गात होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमिपुजन सोहळ्याला मान्यवर हजेरी लावणार आहेत.
पण, काँग्रेस आमदार नारायण राणेनी लावलेल्या पोस्टरमुळे राणेंच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु आहे.
कोकणात शिवसेनेचीच चालते, नारायणास्त्र चालणार नाही अशी टीका विनायक राऊत यांनी केली. राणेंचं स्नेहभोजन भाजपला पचणार नाही असा टोलाही त्यांनी
हाणला.