Sun. Apr 21st, 2019

अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नी गीतांजली खन्ना यांचे निधन

0Shares

प्रसिद्ध अभिनेते दिवंगत विनोद खन्ना यांची पत्नी गीतांजली खन्ना यांचं काल म्हणजेच शनिवारी हृदयविकाराने निधन झाले आहे. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अलिबागमधील मांडवा येथे त्यांचे निधन झाले. यांच्यामागे अक्षय खन्ना व राहुल खन्ना अशी दोन मुले आहेत.

गीतांजली खन्ना यांचे पार्थिव आज सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी अभिनेता अक्षय खन्ना व राहुल खन्ना ही दोन्ही मुले त्यांच्या सोबत होती.

अलिबाग तालुक्यातील मांडवा परिसरात खन्ना कुटुंबीयांचे फार्म हाऊस आहे. याठिकाणी गीतांजली खन्ना व अभिनेते राहुल खन्ना व अक्षय खन्ना हे नेहमी येत असतात.

गीतांजली खन्ना या काल सकाळी मुंबईतून मांडवा येथे आल्या होत्या. रात्री त्यांना त्रास जाणवू लागल्यानंतर खाजगी डॉक्टरला तपासणीसाठी बोलावण्यात आलं. मात्र त्यानंतर काही वेळातच गीतांजली यांचं निधन झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *