Jaimaharashtra news

विनोद खन्ना यांचं मुंबईत निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे प्रदीर्घ आजाराने आज निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

 

1968 मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 1997 मध्ये विनोद खन्ना राजकारणात सक्रीय झाले. भाजपाचे पंजाबमधील गुरुदासपुर खासदार म्हणूनही ते निवडून आले होते.

Exit mobile version