Thu. Sep 29th, 2022

SEBC विद्यार्थ्यांना दिलासा, जात पडताळणी प्रमाणपत्रास सक्ती नाही

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळला आहे. प्रवेशादरम्यान जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सक्ती केली जाणार नाही.

व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळला आहे. प्रवेशादरम्यान जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सक्ती केली जाणार नाही. तसेच प्रमाणपञ सादर करण्यासाठी मुदत वाढवून दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता पुरेशी यंत्रणा तुर्तास उपलब्ध नाही. हा निर्णय घेण्यात आला आहे.

SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा

मराठा समाजातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसाठी जात पडताळणी प्रमाणपञ मिळण्यास विलंब झाल्यास त्यांना मराठा अरक्षणापासून वंचित राहावं लागत आहे.

जात पडताळणी प्रमाणपञ मिळेपर्यंत व्हेरिफिकेशन टोकन नंबर ग्राह्य धरले जावे अशी मागणी विरोधकांनी केली होती.

मुख्यमंत्र्यांची आज प्रवेश नियंत्रण समितीच्या अध्यक्षांसोबत बैठक झाली. या बैठकीला उच्च तंत्र शिक्षणमंत्री आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

SEBC प्रवर्गातील विध्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली जाणार नाही. असा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.