Thu. May 13th, 2021

#VoteKarMaharashtra: ‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडत आहे. यासाठी सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. महाऱाष्ट्रात 96 हजार 661 मतदान केंद्र असून यातील 2747 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. निवडणुकीत  तीन हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत. 30 लाखाहून जास्त फौजफाटा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आला आहे.

‘या’ दिग्गजांनी केले मतदान

सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा अधिकार बजावला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सातारच्या अनंत इंग्लिश स्कूल मध्ये मतदान केले. सकाळी बरोबर 7 वाजता राजमाता कल्पनाराजे, पत्नी दमयंतीराजे यांच्यासह त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. आपला लकी नंबर सात असल्याने आपण 7 वाजता मतदान केले असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापुर शहर मध्य मतदार संघाचे उमेदवार व सीपीएमचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आपल्या परिवारसह मतदानाचा हक्क बजावला आहे .तर सोलापूरमध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुख मतदान केलं.

जालना विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतदान प्रक्रियेला आज सुरवात झाली आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व विद्यमान केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आई प्रतिभा पवार यांनी मतदानाचा हक्का बजावला. बारामती शहरात सकाळी लवकर मतदानाचा हक्क बजावत सर्वांनी मतदान करावे असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,आमदार अमिता चव्हाण यांनी मतदानाचा अधिकार बजावला  आहे.  आंबेडकर महापालिका शाळेत मतदानाचा अधिकार बजावला

शिवसेनेचे राज्यमंत्री तथा जालना मतदारसंघाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी शाळेतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सीमा खोतकर, पुत्र अभिमन्यू खोतकर व कुटुंबातील सदस्य यांनी पण मतदान केलं.

राज्याचे कृषी राज्यमंत्री मा. ना. श्री. सदाभाऊ खोत यांनी सहकुटुंब आपल्या मरळनाथपुर ता. वाळवा जि. सांगली या आपल्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला आणि सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.

जळगाव मुक्ताईनगर मतदार संघांमध्ये माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे आपल्या परिवारासह मतदान करताना खडसे यांना यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारत त्यांच्या कन्येला ऍड रोहिणी ताई खडसे खेवलकर यांना उमेदवारी दिली आहे.

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा महाआघाडी समर्थीत युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील लक्ष्मी नारायण परिसरातील शाळेमध्ये मतदान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *